निवृत्त CJI डी. वाय. चंद्रचूड यांनी सोडला शासकीय बंगला; आता कुठे राहणार यांचा खुलासा
भारताचे माजी मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नवी दिल्लीतील अधिकृत शासकीय निवासस्थान रिकामे केले आहे. नियोजित कालावधीपेक्षा अधिक काळ तिथे वास्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. चंद्रचूड यांनी याबाबत स्पष्ट केले की, ते त्यांच्या पत्नी आणि दोन मुलींसमवेत भाड्याच्या सरकारी घरात राहण्यासाठी स्थलांतर करतील. त्यांनी बंगला उशिरा रिकामा करण्यामागे मुलींच्या आरोग्याच्या कारणांचा उल्लेख…
