Headlines

माजी आमदार अरुणकाका जगताप यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई, दि. 2 :- “माजी आमदार श्री. अरुणकाका जगताप यांच्या दुःखद निधनानं राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, शिक्षण, सहकार अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असलेलं, सामान्यांची घट्ट नाळ जुळलेलं कर्तृत्ववान नेतृत्व हरपलं आहे. तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष, जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष, प्रयोगशील शेतकरी, वारकरी संप्रदायाचा सच्चा पाईक म्हणून ते कायम अहिल्यानगरवासियांच्या लक्षात राहतील….

Read More

वेव्हज परिषद – २०२५ ; भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अॅन्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ (वेव्हज) चे प्रधानमंत्री यांच्या हस्ते शानदार उद्घाटन मुंबई, दि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अ‍ॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते…

Read More

गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र शासन कटिबद्ध – केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील

गावातील पाणी गावातच आडवा शिर्डी, दि.२ :- पुढील चार वर्षांत देशातील कोणतेही गाव, शेत पाण्यापासून वंचित राहू नये व देश दुष्काळमुक्त व्हावा, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून यासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांनी केले. शासन तर आपले काम करणारच आहे, मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पाण्याचा…

Read More

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण वाहतूक खोळंबा; लहान अंतरासाठी लागतोय एक तास.

पुणे : कामगार दिन व उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे अनेक पर्यटक पर्यटन स्थळांकडे रवाना झाल्याने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. खंडाळा घाट ते खालापूर दरम्यान साधारणतः आठ ते दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत असून, काही मिनिटांत पार होणाऱ्या अंतरासाठी तासभराचा वेळ लागत आहे. आजच्या सुट्टीमुळे सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांना बंद असल्याने, तसेच…

Read More

एलपीजी दर: सिलेंडरच्या किंमतीत बदल, स्वस्त झाला की महाग? जाणून घ्या नवीन दर.

एलपीजी दरांमध्ये घसरण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये बदल केला जातो. यामध्ये व्यावसायिक आणि घरगुती दोन्ही प्रकारच्या सिलेंडरच्या किंमती नव्याने ठरवल्या जातात. यंदाही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात घट झाली आहे. जाणून घेऊया, हा बदल तुमच्या खिशावर कसा परिणाम करू शकतो. सिलेंडरच्या दरात नेमका काय बदल झाला? बिझनेस डेस्क, नवी दिल्ली – १ मे रोजी…

Read More

गोडीचा शेतकऱ्यांना दिलासा, शिलाँग ते सिलचर महामार्गास मंजुरी; मोदी मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही मोठे आणि शेतकरीहिताचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये शिलाँग ते सिलचर दरम्यानचा महामार्ग प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. या महामार्गासाठी सुमारे २२,८६४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत या निर्णयांची माहिती दिली. मंत्रिमंडळ बैठकीतील ठळक…

Read More

लेख: श्रीरामपूर (खंडाळा) एमआयडीसी – एक अपूर्ण स्वप्न लेखक: सुमित एस. कुलकर्णी:

1986 मध्ये श्रिरामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली उपजाऊ जमीन MIDC साठी सरकारला दिली, एका आशेने – की त्यांच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, गावाला प्रगतीचा रस्ता सापडेल, आणि एक नवा औद्योगिक युग सुरू होईल. पण 2025 ला उभं राहिलं तर, हाच MIDC 70% रिकामी दिसते, जिथं 1987 पासून फारशी औद्योगिक घडामोडच झाली नाही. प्रश्न असा आहे –…

Read More

“दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्याचा निर्धार – पंतप्रधान मोदी व मोहन भागवत यांची महत्त्वपूर्ण चर्चा”

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास दीड तास चालली. पहलगाम येथे झालेल्या अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर ही चर्चा झाल्याचे समजते. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर भारताने दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानविरोधात…

Read More

अक्षय तृतीया !

भारतीय संस्कृती ही उत्सवप्रिय आणि अध्यात्मिक परंपरांनी समृद्ध आहे. विविध सण, व्रतवैकल्यांमुळे आपले जीवन अधिक रंगीबेरंगी आणि अर्थपूर्ण होते. अशाच एक अत्यंत शुभ आणि पवित्र सण म्हणजे अक्षय तृतीया. वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी साजरा होणारा हा दिवस हिंदू धर्मात विशेष महत्त्वाचा मानला जातो. अक्षय तृतीयाचे महत्त्व ‘अक्षय’ म्हणजे ‘कधीही क्षय न होणारे’ आणि ‘तृतीया’…

Read More

मान्सूनपुर्व कामांचे नियोजन करुन कामे वेळेत पुर्ण करावीत- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी.

पुणे, दि. 29: मान्सूनपुर्व करावयाचे कामांचे सुक्ष्म नियोजन करुन ती सर्व कामे पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत, कामे करतांना सर्व सबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील तसेच त्यांची गैरसोय टाळण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र…

Read More